शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पाटणेकरांचा खासगी ठराव

डॉ. राम मनोहर लोहिया व टी. बी. कुन्हा यांच्या पुतळ्यांसाठी ठराव मांडण्याचा मगोचा निर्णय


06th February 2018, 06:57 pm
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पाटणेकरांचा खासगी ठराव



विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता

पणजी: विधानसभासंकुलात जॅक सिक्वेरांचा पुतळा उभारण्यासाठी दोन खासगी ठराव दाखल झाल्यानंतर आताभाजपाने विधानसभेच्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, असा खासगी ठराव दाखल केला आहे. विधानसभाकामकाजात घेण्यासाठी डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी हा ठराव सादर केला आहे. 

अन्य एका घडामोडीतमगो पक्षाची आज महत्त्वाची बैठक झाली ज्यात विधानसभा संकुलात टी. बी. कुन्हा आणि डॉ. राममनोहर लोहिया यांचे पुतळे बसविण्याचा खासगी ठराव विधासभेत दाखल करण्याचा निर्णयझाला. आमदार दीपक प्रभू पावसकर हा ठरावदाखल करणार आहेत. दरम्यान, जिल्हाआणि राज्य मार्गांना स्वातंत्र्य सैनिकांचे नाव देण्याचा ठरावही मगो दाखल करणारआहे.

विधानसभा संकुलात आणखीपुतळे नको असा निर्णय विधानसभेने यापूर्वी घेतलेला आहे, असे भाजप वारंवार सांगत असल तरी भाजपचेच एक आमदार मायकल लोबो यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याचा ठराव दाखल केलाहोता आणि आज पाटणेकर यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव विधानसभासचिवालयात दिला आहे

विधानसभासचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या चर्चिल आलेमाव आणि मायकल लोबोया दोन आमदारांनी जॅक सिक्वेरांचा पुतळा उभारण्यासाठी खासगी ठराव दिला आहे.काँग्रेसने अजून याविषयीचा ठराव दाखल केलेला नाही. १९ फेब्रुवारीपासून सुरूहोणाऱ्या विधानसभा अधिवेशनासाठी ८ फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदतआहे. काँग्रेस बुधवारी या विषयी आपला ठराव दाखल करण्याची शक्यता आहे.