देवयानी आंबेकरचा फैसला ९ रोजी

अटकपूर्व जामीनावर सत्र न्यायालयात निवाडा राखून


06th February 2018, 09:23 pm

माजी डीआयजी विमल गुप्ता यांना कथित लाचप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक देवयानी आंबेकर, तिचा पती चंदन नाईक व शिपाई चेतन मोरजकर यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय सत्र न्यायालयाने राखून ठेवला आहे. येत्या ९ फेब्रुवारी रोजी न्यायालय आपला निवाडा देणार आहे.

खात्याअंतर्गत चौकशी निकालात काढण्यासाठी उपनिरीक्षक आंबेकर यांनी शिपाई मोरजकर याच्यामार्फत तत्कालीन डीआयजी गुप्ता यांना लाच देण्याचा प्रय़त्न केल्याचा आरोप आहे.