जनरेटर, इन्व्हर्टर बसवण्यासाठी वीज खात्याची परवानगी बंधनकारक!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 05:30 pm
जनरेटर, इन्व्हर्टर बसवण्यासाठी वीज खात्याची परवानगी बंधनकारक!

पणजी : वीज खात्याची परवानगी न घेता ग्राहकाने मुख्य वीज वाहिनीवर जनरेटर, इन्व्हर्टर, सोलर जनरेटिंग प्लांट स्थापित केला आणि त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला पूर्णपणे संबंधित ग्राहकाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा खात्याने जारी केला आहे.

दुरुस्तीकामासाठी वीज खांबावर चढलेल्या मनोज वामन जांबावलीकर (३४, रा. गावकारवाडा-पिळगाव) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. याची चौकशी केल्यानंतर जवळील आस्थापनातील इन्व्हर्टरमधून रिव्हर्स करंट चालू झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे आढळून आले. याच पार्श्वभूमीवर खात्याने आता वरील इशारा दिला आहे. 

सरकारने २१ फेब्रुवारी २०१९ रोजी राजपत्रात ‘वीजपुरवठा संहिता २०१८’ च्या किरकोळ बदल नमूद केले होते. त्यानुसार ग्राहकाला वीज जोडणीवर जनरेटर, इन्व्हर्टर, सोलर जनरेटिंग प्लांट स्थापित करण्यासाठी खात्याकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकाने तशी परवानगी घ्यावी. ही परवानगी न घेता मुख्य वीज वाहिनीवर अशी सामग्री जोडल्यास आणि नंतर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला संबंधित ग्राहकच पूर्ण जबाबदार राहील, असे खात्याने नमूद केले आहे.

हेही वाचा

डिचोलीत खांबावर दुरुस्तीकाम करताना वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू!

हेही वाचा