अमेझॉनकडून फसवणूक : १ लाख खर्चून ऑर्डर केला नवीन लॅपटॉप; बॉक्स उघडताच बसला धक्का

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th May, 02:51 pm
अमेझॉनकडून फसवणूक : १ लाख खर्चून ऑर्डर केला नवीन लॅपटॉप; बॉक्स उघडताच बसला धक्का

मुंबई : ऑनलाइन शॉपिंग ॲप्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु ऑनलाइन ॲप्सची विश्वासार्हता हळूहळू कमी होत आहे. याचे कारण म्हणजे वापरकर्त्यांना योग्य उत्पादन न पुरवणे आणि त्यांची फसवणूक करणे. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. ॲमेझॉन ग्राहकाने 1 लाख रुपयांचा लॅपटॉप ऑर्डर केला जुना लॅपटॉप सोशल मीडियावर व्हायरल झाला 'धोखा हुआ...', ॲमेझॉनकडून 1 लाख रुपयांचा नवीन लॅपटॉप ऑर्डर केला, त्या व्यक्तीला त्या बदल्यात ही वस्तू मिळाली

व्यक्तीने ऑनलाइन शॉपिंग ॲप  अमेझॉनवरून १  लाख रुपयांचा लॅपटॉप खरेदी केला होता. जेव्हा त्याची ऑर्डर आली तेव्हा त्याला आनंद झाला. पण बॉक्स ओपन केल्यावर त्याचा पुरताच भ्रमनिरास झाला.  बॉक्समध्ये चक्क  वापरलेला लॅपटॉप आला होता. सदर व्यक्तीने व्हिडीओ बनवून कंपनीला टॅग करत याबाबत तक्रार केली. 

पोस्टमध्ये, वापरकर्त्याने लिहिले की त्याने ३० एप्रिल रोजी अमेझॉनवरून लेनोवोचा लॅपटॉप ऑर्डर केला आणि तो ७ मे रोजी वितरित केला गेला. परंतु जेव्हा त्याने लेनोवोच्या अधिकृत साइटवर वॉरंटी कालावधी तपासला तेव्हा तेथे डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाल्याची माहिती होती . यावरून लॅपटॉपचा वापर यापूर्वीही झाल्याचे स्पष्ट झाले. वापरकर्त्याने लिहिले, "अमेझॉनने माझी फसवणूक केली. @amazonIN जुनी उत्पादने नवीन म्हणून विकत आहे. आज मला अमेझॉनकडून एक नवीन लॅपटॉप मिळाला, पण तो आधीच वापरला गेला होता आणि डिसेंबर २०२३ मध्ये त्याची वॉरंटी सुरूही झालेली आहे."Amazon Delivery Scam: Explained: Amazon delivery scam and how to identify  it - Times of India

या पोस्टवर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, "ॲमेझॉन हळूहळू विश्वासार्हता गमावत आहे." आणखी एका यूजरने लिहिले की, "यापुढे कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही." आणखी एका युजरने लिहिले की, "माझ्यासोबत यापूर्वीही असे घडले आहे."

हेही वाचा