वसतिगृहातील मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून 'बॉयफ्रेंड'ला पाठवले! आरोपी विद्यार्थिनी सस्पेंड

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th May, 12:56 pm
वसतिगृहातील मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून 'बॉयफ्रेंड'ला पाठवले! आरोपी विद्यार्थिनी सस्पेंड

पुणे : पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींचे खासगी फोटो-व्हिडिओ लीक झाल्याची घटना समोर आली आहे. सीओईपी (कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे) विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीवर हॉस्टेलमधील इतर मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून तिच्या बॉयफ्रेंडसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. आरोपी विद्यार्थिनीला त्वरीत निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिला वसतिगृहातूनही हाकलून देण्यात आले आहे.लड़कियों का वीडियो रिकॉर्ड करती थी, अपने समुदाय के लड़कों को भेजती थी

मिळालेल्या माहितीनुसार, १  मेच्या रात्री वसतिगृहातील काही विद्यार्थिनींनी मिळून आरोपी मुलीची चौकशी केली. ती गुप्तपणे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याचा त्यांना संशय होता. आरोपीच्या फोनमधून ९०० हून अधिक फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत जे व्हॉट्सॲपवर दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर केले होते. या घटनेमुळे वसतिगृहात चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर ५ मे पर्यन्त हे प्रकरण सोशल मीडियावर पोहोचले.लिस्ट ऑफ़ टॉप लेडीज होस्टल्स इन अहमामऊ - बेस्ट हॉस्टल फॉर वीमेन - Justdial

आरोपी आर्या काळे हिने हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून ते तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवले होते. या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी या व्हिडीओंचा गैरवापर करून विद्यार्थिनींच्या प्रायव्हसीचा भंग केला आहे. या दोघांनी मिळून अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पाठवले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील चौकशी होईपर्यंत आर्या काळेला निलंबित केले आहे

दरम्यान यासंबंधी वसतिगृहाच्या एका विद्यार्थिनीचे एक ट्विट समोर आले आहे. 

अहवालानुसार दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ मे रोजी विद्यापीठाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली. काही विद्यार्थिनींनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी २  मे रोजीच या प्रकरणाची माहिती अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, विद्यापीठाचे कुलसचिव डी.एन.सोनवणे यांनी ३ मे रोजी संपर्क साधल्याचे सांगितले.होटल के बाथरूम में नहाती महिला का वीडियो बनाते पकड़ा गया वेटर, बेटे समेत  दूसरे स्टाफ ने जमकर धुना - a waiter caught making video of woman bathing in  hotel bathroom lcln -

या प्रकरणी लवकरात लवकर एफआयआर का नाही नोंदवण्यात आली अशी विचारणा केली असता कुलसचिव डी.एन.सोनवणे यांनी स्पष्ट केले होते की, ही मुलींशी निगडित संवेदनशील बाब आहे आणि आपण घाईने कोणतेही पाऊल उचलू इच्छित नाही. मात्र, आता पोलिसात तक्रार दाखल केल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.नहाते समय बाथरूम की दीवार पर पड़ी डॉक्टर की नजर, उड़ गए होश - cleaning  worker made video seeing female resident doctor taking bath lclp - AajTak