श्रीदेवी लईराई जत्रेनिमित्त शिरगावात तयारीला वेग; धोंडगण व्रतस्थ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th May, 04:03 pm
श्रीदेवी लईराई जत्रेनिमित्त शिरगावात तयारीला वेग; धोंडगण व्रतस्थ

शिरगाव : डिचोली तालुक्यातील शिरगावातील प्रसिद्ध जत्रा येत्या १२ मे रोजी पार पडणार आहे. शिरगावच्या लईराईची महती गोवा तसेच शेजारील राज्यांतही पसरलेली आहे. जत्रेनिमित्त अवघ्या डिचोली परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाल्याचे दृश्य पहायला मिळत आहे. देवी लईराईच्या धोंडगणांनी परंपरेनुसार सोवळ्याचे पालन करून पाच आणि तीन दिवसांच्या व्रतास सुरवात केली आहे.   Shirgaon Jatra Goa | The Shirgaon jatra is a yearly event he… | Flickr

गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील विविध गावातील धोंडगण हे  जत्रेदरम्यान गावातील मंदिर परिसरात एकत्र राहतात. व्रतस्थ धोंड स्नान करूनच फराळ किंवा जेवणाचे पुढील विधी करतात. लहान मुले तसेच महिलाही सोवळ्याचे पालन करून अग्निदिव्यासाठी सज्ज आहेत. धनगरवाडी हरिजन वाडी तसेच विविध ठिकाणी भाविकांनी व्रत सुरू केले आहे. पाच दिवस सगळ्यापासून अलिप्त राहत सोवळ्याचे पालन करणे हा विलक्षण अनुभव असल्याचे व्हाळशी-डिचोली येथील यशवंत परब, शेखर नाईक आणि नवनाथ नाईक यांनी सांगितले. Tiada huraian foto disediakan.

यंदा देवी लईराईच्या जत्रेनिमित्त मंदिर प्रशासन तसेच शिरगावच्या ग्रामस्थांनी, जत्रेसाठी गावात येणाऱ्या भाविकांच्या स्वागतात कोणतीही कसूर राहू नये यासाठी जय्यत तयारी केली आहे. भाविकांची गैरसोय टाळता यावी यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी दिली. मंदिर प्रशासनाने वाहतूक व्यवस्था, पाणी व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, लोकांची सुरक्षा तसेच भाविकांना योग्य पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी योग्य बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने आढावा बैठक घेतलेली असून सर्व भाविकांनी पाच दिवसात देवस्थान समिती व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष गणेश गावकऱ्यांनी केले आहे.In devotion of Lairai Devi – The Navhind Times

जत्रेनिमित्त गावात मोठी फेरी भरते. त्यासाठी मिठाई व इतर दुकाने थाटण्याच्या तयारीलाही सुरुवात झालेली आहे.हजारो व्रतस्थ धोंड १२ मे रोजी मध्यरात्री अग्निदिव्य साकारतील आणि हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची तुडुंब गर्दी भरणार आहे.  लोकांना अग्नीदिव्य प्रत्यक्षात पाहता यावे यासाठी विशेष सोय करण्यात देवस्थान समिती व प्रशासनाचे पदाधिकारी कार्यरत झाले आहेत.Shree Lairai Devi Temple at Shirgaon Goa | Dazling Goa

जत्रेनिमित्त  लाखोंची उलाढाल

जत्रोत्सवात संपूर्ण गोव्यात बाजारात तसेच बाजूच्या भागात लाखो रुपयांची उलाढाल होत असते.  कपडे, खाद्यपदार्थ, फुले इत्यादींना मोठी मागणी असते. मोगरीच्या कळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने गोवा तसेच इतर राज्यातूनही शेकडो लोक मोगरीचे कळे विकण्यासाठी शिरगावात दाखल होत असतात.दरवर्षी नवीन धोंड देवी चरणी आपली सेवा बजावण्यास दाखल होतात. या ठिकाणी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन व देवस्थान समिती विशेष प्रयत्न घेत असुन वाढती गर्मी लक्षात घेता अनेक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.sawani shetye on X: "#108GoaTemples Temple2: lairai Devi, Shirgao Lairai  'aai' is one amongst 7folk goddess sisters &brother. Her vigraha is  worshipped in form of a 'kalash'. On her jatra, devotees offer

गोभी मंचुरीयनच्या स्टॉलना शिरगावच्या जत्रेनिमित्त पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याची माहिती गणेश गावकर यांनी दिली. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे व कापडी व इतर पिशव्यांचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. 


हेही वाचा