गोवा दरबारजवळ आग, सात गाड्या खाक

पर्यटन खात्याच्या नऊ बोटी भस्मसात


03rd February 2018, 09:15 pm


मालपे विर्नोडा येथे लागलेल्या भीषण आगीत पर्यटन खात्याच्या जागेत ठेवण्यातआलेल्या गाड्या व बोटी जळून खाक झाल्या. आगीची माहिती मिळताच पेडणे अग्निशामक दलाचेजवान दाखल झाले, परंतु एकमेव बंबातील पाणी संपल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंबझाला. यावेळी म्हापशाहून अतिरिक्त मदत मागवण्यात आली.

महामार्गाला लागूनच असलेल्या गोवा दरबार येथे पर्यटन खात्यातर्फे जुनाट गाड्याव बोटी आणून ठेवण्यात आल्या होत्या. रस्ता रुंदीकरण करतेवेळी जवळच कापून ठेवलेल्याझाडांना अज्ञाताने लावलेली आग पसरली व ही दुर्घटना घडली.