सरकारी अर्जांवर दीनदयाळांचे चित्र कशाला?

लोकशाही व स्वातंत्र्य संग्रामाचा अपमान असल्याचा काँग्रेसचा दावा


02nd February 2018, 07:13 pm
सरकारी अर्जांवर दीनदयाळांचे चित्र कशाला?


राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या अर्जांवर छापण्यात आलेल्या दीनदयाळउपाध्याय यांच्या चित्राला काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी अर्जांवरील हे चित्र त्वरितहटवण्यात यावे, अशी मागणी केली. दीनदयाळ उपाध्याय हे लोकशाही, स्वातंत्र्य व धर्मनिरपेक्षतेच्याविरोधात होते, असा दावा नाईक यांनी केला.

दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नोकरभरतीत घोटाळा असल्याचासंशय त्यांनी व्यक्त केला. याप्रकरणाची  दक्षता खात्याने स्वेच्छा दखल घ्यावी, अशी मागणीत्यांनी केली.