कुंकळ्ळीत ७ लाखांचे दागिने चोरले

देवसा येथील घरात अज्ञात चोरट्यांचा प्रवेश


05th February 2018, 09:18 pm
कुंकळ्ळीत ७ लाखांचे दागिने चोरले

 

देवसा कुंकळ्ळी येथील देबोराह लोबो यांच्या घरातून सुमारे ७ लाखांचे दागिनेचोरीस जाण्याची घटना सोमवारी उघडकीस आली. देबोराह यांच्या घराच्या मुख्य दरवाजातूनअज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील कपाटाच्या चाव्या मिळवून चोरट्यांनी किमतीऐवज पळवला. यात सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. याची किंमत सुमारे ७लाखांच्या आसपास असल्याचे समजते. पोलिस पुढील तपास करत आहेत.