बेशिस्त पर्यटकांवर यंत्रणेची करडी नजर

४६ जणांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई, एक पार्टी पाडली बंद


03rd February 2018, 08:00 pm
बेशिस्त पर्यटकांवर यंत्रणेची करडी नजर

विदेशी व देशी पर्यटकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे होत असलेले उल्लंघन वरात्री उशिरापर्यंत आयोजित पार्ट्यांमध्ये चालणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारीयंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पोलिस, वाहतूक पोलिस वएटीएसद्वारे संयुक्त कारवाई केली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत शिवोलीतीलटी-जंक्शनजवळ ४६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात ९ विदेशी नागरिकांचा समावेशहोता. तसेच, रात्री उशिरापर्यंत चाललेली पार्टी बंद पाडण्यात आली. यावेळी पार्टीतसंगीत वाजवण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.