गोव्यात सुपारी लागवडीत तीन वर्षांत ७२ हेक्टरने वाढ

उत्पादनातही ९३ टनांची वृद्धी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th September, 08:57 pm
गोव्यात सुपारी लागवडीत तीन वर्षांत ७२ हेक्टरने वाढ

राज्यात सुपारीच्या लागवडीत तसेच उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सुपारीच्या लागवडीत ७२ हेक्टरने वाढ झाली असून, उत्पादनातही ९३ टनांनी वाढ झाली आहे, असे कृषी संचालनालयाने सांगितले.

राज्यात सुपारीची लागवड आंतरपीक म्हणून माडांच्या बागायतीत केली जाते आणि गोव्यातील बाराही तालुक्यांत तिचे उत्पादन घेतले जाते. २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत सुपारीचे एकूण लागवड क्षेत्र ६,३९३ हेक्टर, तर उत्पादन १२,०५१ टन इतके नोंदवण्यात आले.

सुपारी लागवडीत ३.४३ टक्के, उत्पादनात ४.४३ टक्के वाढ२०२५-२६ मध्ये सुपारीचे लागवड क्षेत्र २,१७१ हेक्टरवर पोहोचले असून उत्पादन ४,०७१ टन झाले आहे. तीन वर्षांच्या तुलनेत लागवड क्षेत्रात ७२ हेक्टर, तर उत्पादनात ९३ टनांनी वाढ झाली आहे.

या तीन वर्षांच्या कालावधीत लागवड तसेच उत्पादनात सातत्याने वाढ झाली असून, यंदा लागवडीत ३.४३ टक्के आणि उत्पादनात ४.४३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

तीन वर्षांत लागवडीत सातत्याने वाढ

आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये २,०९९ हेक्टर क्षेत्रावर सुपारीची लागवड करण्यात आली होती आणि ३,९७८ टन उत्पादन मिळाले. त्यानंतर २०२४-२५ मध्ये लागवडीखालील क्षेत्रात २,१२३ हेक्टरपर्यंत वाढ झाली, तर उत्पादन ४,००२ टन झाले.

पुढे २०२५-२६ या वर्षात लागवडीचे क्षेत्र २,१७१ हेक्टरवर पोहोचले आणि उत्पादन ४,०७१ टनांपर्यंत वाढले.

वर्षनिहाय सुपारी लागवड आणि उत्पादन

२०२३-२४ : २,०९९ हेक्टर लागवड | ३,९७८ टन उत्पादन

२०२४-२५ : २,१२३ हेक्टर लागवड | ४,००२ टन उत्पादन

२०२५-२६ : २,१७१ हेक्टर लागवड | ४,०७१ टन उत्पादन

एका वर्षात ४८ हेक्टरने लागवड वाढली

या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास, २०२४-२५ मध्ये सुपारीच्या लागवडीत २३ हेक्टरने, तर उत्पादनात २४ टनांनी वाढ झाली. तसेच २०२५-२६ मध्ये लागवड क्षेत्रात आणखी ४८ हेक्टरने, तर उत्पादनात ६९ टनांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

सुपारी उत्पादन ४ हजार टनांच्या पुढे२०२४-२५ मध्ये ४,००२ टनांवर पोहोचलेले सुपारीचे उत्पादन २०२५-२६ मध्ये आणखी ६९ टनांनी वाढून ४,०७१ टन झाले.
हेही वाचा
सर्व पहा