गोव्यात दोन वर्षांत खंडित वीज पुरवठ्याचा १० लाख ग्राहकांना फटका

मागील काही वर्षांत राज्यात विजेच्या मागणीत वाढ होत आहे. यादरम्यान वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना देखील वाढत आहेत. राज्यात एप्रिल २०२४ ते मार्च २०२६ मध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या ९,१५७ घटनांची नोंद झाली. याचाच अर्थ दिवसाला सरासरी १२ हून अधिक वेळेस वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्राहकांना एका किंवा त्याहून अधिक खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागला. यादरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने तब्बल १० लाख ११ हजार ४८३ ग्राहकांना फटका बसला.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
गोव्यात दोन वर्षांत खंडित वीज पुरवठ्याचा १० लाख ग्राहकांना फटका

पणजी : मागील काही वर्षांत राज्यात विजेच्या मागणीत वाढ होत आहे. यादरम्यान वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना देखील वाढत आहेत. राज्यात एप्रिल २०२४ ते मार्च २०२६ मध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या ९,१५७ घटनांची नोंद झाली. याचाच अर्थ दिवसाला सरासरी १२ हून अधिक वेळेस वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्राहकांना एका किंवा त्याहून अधिक खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागला. यादरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने तब्बल १० लाख ११ हजार ४८३ ग्राहकांना फटका बसला.

कुडचडे येथे सर्वाधिक घटना

यामध्ये तांत्रिक कारणास्तव पुरवठा खंडित होण्यासह दुरुस्ती आणि देखभालीसाठी पूर्वनियोजित पद्धतीने खंडित करण्यात आलेल्या घटनांचा समावेश आहे. वरील आकडेवारी एकूण १० विभागातील आहे. दोन वर्षांत विभाग ७ - कुडचडे येथे वीज पुरवठा खंडित होण्याच्या सर्वाधिक ३,०५२ घटना घडल्या. यामुळे ८२ हजार हून अधिक ग्राहकांना फटका बसला. यानंतर विभाग  १०- फोंडा मध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या २,३५३ घटना घडल्या. यामध्ये १.४० लाख ग्राहकांना फटका बसला.

मडगाव, म्हापसा, डिचोली, वास्को विभागांमध्येही घटनांची नोंद

मडगाव, म्हापसा, डिचोली, वास्को विभागांमध्येही अशा घटनांची नोंद झाली. यामध्ये नुकसान झालेल्या ग्राहकांचे प्रमाण तुलनेने कमी होते. कालावधी नुसार पाहता दोन वर्षांत विविध विभागांमध्ये धरून तब्बल ३२ हजार तास कालावधींसाठी वीज गायब झाली होती. बहुतेक वेळा फिडर ट्रिप होणे किंवा फिडर संबंधित अन्य समस्यांमुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. याशिवाय ट्रान्सफॉर्मर मधील समस्या, देखभालीसाठी पूर्वनियोजित वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. हवामानाच्या समस्या, ‘ओव्हर लोड’ अशा कारणांमुळे देखील वीज पुरवठा खंडित झाला होता.

हेही वाचा
सर्व पहा