पर्वरी उड्डाणपुलावर आता ‘स्पीड कॅमेरां’ची नजर

मंगळवारी बसवण्यात आले ‘स्पीड कॅमेरे’; भीषण अपघातानंतर उपाययोजना : पर्वरी येथे नव्यानेच वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात दोघांना मृत्यू आल्यावर आणि दोघे जखमी झाल्यावर येथील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक खाते व वाहतूक पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी याठिकाणी पाहणी करून दोन ‘स्पीड कॅमेरे’ बसवण्यात आले. तसेच अटल सेतूवरून पर्वरीच्या दिशेने उतरताना आणखी एका ठिकाणी ‘स्पीड कॅमेरा’ बसवण्यात आला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
पर्वरी उड्डाणपुलावर आता ‘स्पीड कॅमेरां’ची नजर

पणजी : पर्वरी येथे नव्यानेच वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात दोघांना मृत्यू आल्यावर आणि दोघे जखमी झाल्यावर येथील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक खाते व वाहतूक पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी याठिकाणी पाहणी करून दोन ‘स्पीड कॅमेरे’ बसवण्यात आले. तसेच अटल सेतूवरून पर्वरीच्या दिशेने उतरताना आणखी एका ठिकाणी ‘स्पीड कॅमेरा’ बसवण्यात आला.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांचा अतिवेग आणि त्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. विशेषत: उड्डाणपूल परिसरात वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे पाालन केले जाते की नाही, वाहतूक नियम पाळले जातात की नाही, यासाठी या यंत्रणेमुळे अधिक प्रभावी देखरेख ठेवता येणार आहे.

पर्वरी येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत व इतर मंत्री, आमदारांच्या उप‌स्थितीत नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या पुलावर भीषण अपघातात दोघे मृत्यू पावले होते तर दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर एकच खळबळ माजली होती. पुलावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री द‌िगंबर कामत, अधिकारी व संबंधितांनी पर्वरी उड्डाणपुलाची पाहणी केली होती.

त्यानंतर सुरळीत वाहतुकीसाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर या रस्त्यावरून वाहतुकीसाठी दुचाकींवर बंदी घालण्यात आली होती. आता या पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांचाही जागता पहारा याठिकाणी आहे. 

हेही वाचा
सर्व पहा