म्हापसा : आपल्या काही मित्रांसोबत जेवायला गेले असता; बिलावरून झालेल्या वादातून हॉटेलचे मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना वर्दीचा खाक्या दाखवत धमकावल्याप्रकरणी उपनिरीक्षक विराज सावंत (पीएसआय) याचीजीआरपीत बदली करण्यात आली. धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक विराज पाटील, त्याचा मित्र आकाश तानाजी पाटील व अन्य एक मिळून रोहित रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर बिलावरून हॉटेल कर्मचारी व त्यांच्यामध्ये वाद झाला. विराज व त्याच्या मित्रांनी आवाज चढवत त्यांना धमकी दिली. याचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले. त्यानंतर ते चित्रण व्हायरल करण्यात आले. याची दखल घेत पीएसआय विराज सावंत याला सेवेतून निलंबित करण्यात आले.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून हे तिघेही फुकटे ग्राहक रेस्टॉरंट धमकावत होते. धमकीला कंटाळून शेवटी हॉटेल मालकाने ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, पर्वरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज सकाळी व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलीस खाते जागे झाले व विराज सावंत याला निलंबित करण्यात आले.
यापूर्वी झाली होती बदली
मोपा येथील पर्यटक टॅक्सीवाल्यांसोबत वाद घातल्यानंतर जुलै मध्ये उपनिरीक्षक विराज सावंत याची मोपा पोलीस स्थानकातून पर्वरी पोलीस स्थानकात बदली करण्यात आली होती. तर काल विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर वादग्रस्त ठरलेल्या इतर काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.


