मेस्तावाडा, मांद्रे येथे मोडकळीस आलेल्या घराला मिळाले नवे छप्पर

मेस्तावाडा, मांद्रे येथील विठू चारी यांच्या मोडकळीस आलेल्या मूळ घराच्या छप्पराची माजी जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशाकर यांनी स्वखर्चाने दुरुस्ती करून दिली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे चारी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
44 mins ago
मेस्तावाडा, मांद्रे येथे मोडकळीस आलेल्या घराला मिळाले नवे छप्पर

पेडणे :  मेस्तावाडा, मांद्रे येथील विठू चारी यांच्या मोडकळीस आलेल्या मूळ घराच्या छप्पराची माजी जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशाकर यांनी स्वखर्चाने दुरुस्ती करून दिली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे चारी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

घराचे छप्पर जीर्ण झाल्याने चारी कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात येताच रंगनाथ कलशाकर यांनी पुढाकार घेत छप्पर दुरुस्तीचे काम स्वखर्चाने करून दिले.

यावेळी मांद्रे गट काँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर, काँग्रेस नेते प्रदीप हरमलकर, काँग्रेस कार्यकर्ते विल्सन फर्नांडिस यांच्यासह अन्य कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

गरजू कुटुंबाला आधार देत रंगनाथ कलशाकर यांनी केलेले हे समाजाभिमुख कार्य माणुसकी आणि समाजसेवेचा आदर्श ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा