मोपा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग

इंजिनमध्ये बिघाडाची शक्यता; २२९ प्रवासी सुखरूप

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
01st September, 05:49 pm
मोपा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग

पणजी : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (मोपा)  दिल्लीकडे उड्डाण केलेल्या इंडिगोच्या ६ई २१०२ (6E 2102)  या विमानाचे मंगळवारी  उड्डाणानंतर काही वेळातच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याचे प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९.२८ वाजता विमानाने मोपाहून दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आल्यानंतर विमान पुन्हा मोपा विमानतळाकडे वळवण्यात आले. त्यानंतर विमानाचे सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

विमानातील सर्व २२९ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.  या घटनेमुळे विमानतळावर काही काळ सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली होती.

प्रवाशांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी दुपारच्या सुमारास पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.