‘ओंकार’ गोव्यातील मुक्काम संपवून पुन्हा महाराष्ट्रात

गोवा-महाराष्ट्र सीमेवर वनविभागाची नजर; गावकऱ्यांमध्ये धास्ती कायम : गोव्यातील पेडणे तालुक्यातील सीमेवरील गावांमध्ये फिरून नागरिकांची चिंता वाढवणारा ‘ओंकार’ हत्ती पुन्हा महाराष्ट्रातील दोडामार्गच्या दिशेने परतला आहे. गेल्या काही दिवसांत गोव्यात ठाण मांडून येथील शेतकरी, बागायतदारांना त्रस्त करून सोडले होते. शेती, बागायतीचे मोठे नुकसान केले. त्यानंतर तो पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने जात दोडामार्ग येथे एका दुकानात शिरून नंतर कळणे नदीच्या पात्राजवळ मुक्कामी असल्याची माहिती आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
44 mins ago
‘ओंकार’ गोव्यातील मुक्काम संपवून पुन्हा महाराष्ट्रात

दोडामार्ग : गोव्यातील पेडणे तालुक्यातील सीमेवरील गावांमध्ये फिरून नागरिकांची  चिंता वाढवणारा ‘ओंकार’ हत्ती पुन्हा महाराष्ट्रातील दोडामार्गच्या दिशेने परतला आहे. गेल्या काही दिवसांत गोव्यात ठाण मांडून येथील शेतकरी, बागायतदारांना त्रस्त करून सोडले होते. शेती, बागायतीचे मोठे नुकसान केले.  त्यानंतर तो पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने जात दोडामार्ग येथे एका दुकानात शिरून नंतर कळणे नदीच्या पात्राजवळ मुक्कामी असल्याची माहिती आहे.

‘ओंकार’ यापूर्वीही नेतार्डे, तांबोसे, मोपा परिसरातून गोवा-महाराष्ट्र सीमेवर वारंवार ये-जा करत असल्याने सीमावर्ती गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती आणि बागायतींचे मोठे नुकसान करीत असल्याने शेतकरी, बागायतदार त्याला कसे रोखावे या विवंचनेत आहेत. 

‘ओंकार’च्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गोवा आणि सिंधुदुर्ग वनविभागाकडून सीमेवर विशेष देखरेख ठेवण्यात आली आहे. हत्ती आणि नागरिकांमध्ये संघर्ष होऊ नये, यासाठी वनकर्मचाऱ्यांकडून त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.

गोव्याची सफर करून ‘ओंकार’ पुन्हा महाराष्ट्रात परतल्याने पेडणेतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे, तरी त्याच्या वारंवार होणाऱ्या सीमापार हालचालींमुळे वनविभागाची चिंता कायम आहे.