मराठी राजभाषा निर्धार समितीचा मोर्चा मांडवी पुलावर रोखला; मुख्यमंत्री भेट देईपर्यंत आंदोलन कायम : वेलिंगकर

अशा प्रकारची आंदोलने होणे स्वाभाविक : मुख्यमंत्री; : मराठीला गोव्याची राजभाषा म्हणून मान्यता द्यावी, या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समितीने काढलेला मोर्चा आज पोलिसांनी मांडवी पुलाजवळ रोखला. मराठी राजभाषा निर्धार समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. जोपर्यंत भेट होत नाही, तोपर्यंत रस्त्यावर बसून आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती समितीचे सुभाष वेल‌िंगकर यांनी दिली. ‘आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अशा प्रकारची आंदोलने होणे स्वाभाविक आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
33 mins ago
मराठी राजभाषा निर्धार समितीचा मोर्चा मांडवी पुलावर रोखला; मुख्यमंत्री भेट देईपर्यंत आंदोलन कायम : वेलिंगकर

पणजी : मराठी भाषेला गोव्याची राजभाषा म्हणून मान्यता द्यावी, या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समितीने काढलेला मोर्चा आज पोलिसांनी मांडवी पुलाजवळ रोखला. मराठी राजभाषा निर्धार समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. जोपर्यंत भेट होत नाही, तोपर्यंत रस्त्यावर बसून आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती समितीचे सुभाष वेल‌िंगकर यांनी दिली. ‘आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अशा प्रकारची आंदोलने होणे स्वाभाविक आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.  

विधानसभेवर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आज सोमवारी सकाळी मराठी भाषा समर्थक, भाषाप्रेमी मोठ्या संख्येने पणजीत दाखल झाले.  त्यामुळे पणजी बसस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली. मराठी भाषेच्या समर्थनार्थ फलक घेऊन मराठी भाषाप्रेमी त्यात सहभागी झाले. त्यात महिलांचाही मोठा सहभाग आहे.

मांडवी पुलावर पोलिसांनी मोर्चा रोखला

सर्व एकत्र जमल्यावर मोर्चा पर्वरी येथील विधानसभेकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाला. मात्र, मांडवी पुलावर पोलिसांनी मोर्चा रोखला. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले व आंदोलन सुरू ठेवले. मराठी भाषा निर्धार समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जोपर्यंत भेट देत नाहीत; तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केला. 

गोवा विधानसभा अधिवेशनाचा आज पहिला दिवस असल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी यावेळी जोरदारपणे मांडली जाणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे. 

कडक पोलीस बंदोबस्त 

गोव्यातील विविध भागातून मराठी भाषा समर्थक, भाषाप्रेमी पणजी बसस्थानक परिसरात जमत आहेत. त्यानंतर तेथून हा मोर्चो पर्वरी येथील विधानसभेकड कुच करणार आहे. पणजी बसस्थानक ते पर्वरी येथील विधानसभेपर्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी सज्ज झाले आहेत. एकूण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. 

अशा प्रकारची आंदोलने होणे स्वाभाविक : मुख्यमंत्री डॉ.  सावंत 

दरम्यान, या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना, म्हटले आहे की, “आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अशा प्रकारची आंदोलने होणे स्वाभाविक आहे.” 


हेही वाचा
सर्व पहा