कांदा, साखरेसह मसाले महागले

म्हापसा बाजारात महागाईच्या झळा : वेलची ६ हजार, खसखसने गाठला २ हजारचा आकडा

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
01st September, 09:18 pm
कांदा, साखरेसह मसाले महागले

म्हापसा

येथील बाजारपेठेत कांदा, साखरेसह मसाल्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. वेलची ६ हजार, तर खसखसने २ हजारचा आकडा गाठला आहे. मासळीमध्ये इसवणचा दरही ८०० रुपयांवर पोहाचला आहे.

भाजीपाल्याचा किलो मागे किरकोळ दर, टॉमेटो ४० रुपये, बटाटे ४० रुपये, कांदा ६० रुपये, गाजर ८० रुपये, वांगी ५० रुपये, ढब्बू मिरची ५० रुपये, कोबी ३० रुपये, कॉली फ्लॉवर ३० रुपये, दुधी ३० रुपये, काबूल (चिटकी) ५० रुपये, मिरची ८० रुपये, आले १२० रुपये, लसूण २२० रुपये, भेंडी ६० रुपये, लिंबू ५ रुपये नग, पालक १५ रुपये जुडी, तांबडी भाजी १५ रुपये जुडी, कोथिंबीर २० रुपये जुडी, शेपू १५ रुपये जुडी, कांदा पात १० रुपये जुडी, मेथी १५ रुपये जुडी, मका ५० रुपयांना तीन नग, कारले ४० रुपये, दोडके ६० रुपये, बीट ८० रुपये, वालपापडी १२० रुपये, वाल ८० रुपये, काकडी ३० रुपये, नारळ ३० ते ५० रुपये नग, मशरूम ५० रूपये, बेबीकॉर्न ५० रूपये, नीरफणस २०० ते ४०० रुपये.

मासळीमध्ये इसवण ८०० रुपये, चणाक ५०० रुपये, पापलेट ४०० (काळी) रुपये, पांढरी पापलेट ६०० रुपये, सुंगटा (कोळंबी) ३०० रुपये, कर्ली २०० रुपये, बांगडा २०० रुपये, टोकी २०० रुपये, लेपो २०० रुपये, खेकडे २०० रुपये, खुबे-तिसऱ्या १०० रुपये, वेरली २०० रुपये, माणक्या २०० रुपये, दोडयारे २०० रुपये, मडसो ४०० रुपये, मुटूशो ५०० रुपये, तारली २०० रुपये.

तूरडाळ १४० ते १६० रुपये, चवळी १४० रुपये, मूग १२० रुपये, मसूर १०० रुपये, वाटाणे ८० रुपये, हिरवे वाटाणे १२० रुपये, हरभरे १०० रुपये, काबूल १४०, सोनामसूरी तांदूळ ६० रुपये, बासमती तांदूळ ६० ते १२० रुपये, गहू ४० रुपये, नाचणे ५० रुपये, साखर ६५ रुपये, गुळ ८० रुपये, चहा पावडर २८० रुपये, आटा ५० रुपये, पामतेल २०० रुपये लिटर असा दर आहे.

फळांमध्ये सफरचंद २०० रुपये किलो, संत्रे २०० रुपये किलो, मोसंबी २०० रुपये किलो, पपई ६० रुपये किलो, पेरू २०० रुपये किलो, चिबूड १०० रुपये, चिकन २२० रुपये किलो, मटण १००० रुपये किलो व अंडी ९० रुपये डझन. फुलांमध्ये झेंडू ९० रुपये किलो, शेवंती १२० रुपये किलो, गुलाब १२० रुपये किलो.

कर्नाटकच्या मिरचीला ६०० रुपयांचा भाव

सध्या गोव्यातील गावठी मिरची बाजारात उपलब्ध नसून कर्नाटकातील गावठी मिरची ६०० रुपये, काश्मिरी ९०० रुपये, गुंटूर मिरची ३६० रुपये, बेडगी ६०० रुपये, कोथंबीर २८० रुपये, खसकस २००० रुपये, हळद ३४० रुपये, बडिशेप ४०० रुपये, लवंग १४०० रुपये, वेलची ६००० रुपये, टिकी (साल) ६०० रुपये, टिकी (पान) २०० रुपये, मिरची पावडर ६०० रुपये, हळद पावडर ४०० रुपये, तेल २०० रुपये लिटर, खोबरेल तेल ३०० रुपये लिटर असा दर आहे. 

हेही वाचा
सर्व पहा