बनावट जीएसटी सल्लागार प्रकरणात १०.०६ कोटींचा घोटाळा

संशयिताला बेळगावात अटक;

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
48 mins ago
बनावट जीएसटी सल्लागार प्रकरणात १०.०६ कोटींचा घोटाळा

पणजी :बनावट जीएसटी (GST) आणि कर सल्लागारप्रकरणात तब्बल १०.०६कोटी रुपयांच्या चुकीच्या‘इनपुट टॅक्स क्रेडिट’च्यादाव्याशी संबंधित असलेल्यानकीब मुल्ला याला गोवा पोलिसांच्याआर्थिक गुन्हे शाखेने (EOC)अटक केली. त्यालाचार दिवसांची पोलीस कोठडीसुनावण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनाहवा असलेला मुल्ला फरार होता.आर्थिक गुन्हे शाखेच्यापथकाने त्याचा शोध घेत बेळगावयेथे त्याला ताब्यात घेतले.पोलीस निरीक्षक रझाशादशेख यांच्या नेतृत्वाखालीलपथकाने ही कारवाई केली.त्यांच्यासोबत दोनपोलीस कॉन्स्टेबल सोबतीलाहोते. अटकेनंतरमुल्लाला गोव्यात आणण्यातआले.

म्हापसा येथीलप्रथमवर्ग न्यायालयात उपस्थितकेले असता; त्यालाचार दिवसांची पोलीस कोठडीसुनावण्यात आली. याप्रकरणात बनावट जीएसटी व करसल्लागाराच्या माध्यमातूनकराशी संबंधित गैरव्यवहारझाल्याचा आरोप आहे. आर्थिकगुन्हे शाखेकडून पुढील तपाससुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा