स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा बाप दोषी

सरकारी अभियोक्ता अर्चना भोबे आणि शिल्पा नागवेकर यांनी युक्तिवाद करून पुरावे सिद्ध केले. पीडितेची, शिक्षिकेची आणि मैत्रिणींची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपी बापाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरविले. शिक्षेवर युक्तिवाद करण्यासाठी सुनावणी २४ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.


7 hours ago
स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा बाप दोषी

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : मुरगाव तालुक्यातील १६ वर्षीय स्वतःच्याच मुलीवर २०२४ मध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाने बापाला दोषी ठरविले. शिक्षेची सुनावणी २४ आॅगस्ट रोजी होणार आहे. याबाबतचा निवाडा न्या. डाॅ. पूजा कवळेकर यांनी जारी केला आहे.
या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी २६ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पीडित मुलीच्या शिक्षिकेने तक्रार दाखल केली होती. तक्रारीत पीडितेवर तिच्या वडिलानेच लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले. पीडितेने मैत्रिणींना आणि शिक्षिकेला घडलेला प्रकार सांगितला होता. वेर्णाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मेलसन्स कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस यांनी वडिलाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४ आणि ८ कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. पोलिसांनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाॅक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्यांची दखल घेऊन आरोप निश्चित करून खटला सुरू केला. संशयिताने अनेक वेळा दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला होता.
या प्रकरणी सरकारी अभियोक्ता अर्चना भोबे आणि शिल्पा नागवेकर यांनी युक्तिवाद करून पुरावे सिद्ध केले. पीडितेची, शिक्षिकेची आणि मैत्रिणींची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपी बापाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरविले. शिक्षेवर युक्तिवाद करण्यासाठी सुनावणी २४ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.

हेही वाचा
सर्व पहा