पर्वरी उड्डाणपुलाचे ९ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण

पर्वरी उड्डाणपुलाचे लोकार्पण १० सप्टेंबरऐवजी ९ सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली.


1 hours ago
पर्वरी उड्डाणपुलाचे ९ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : पर्वरी उड्डाणपुलाचे लोकार्पण १० सप्टेंबरऐवजी ९ सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून संदेश आल्यानंतर ९ सप्टेंबरला सायंकाळी उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर म्हापसा-पणजी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असून काही मिनिटांत हा प्रवास करता येणार आहे. उड्डाणपूल सुरू झाल्याने पणजी-म्हापसा मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल दोन वर्षांत पूर्ण करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी चतुर्थीपूर्वी उड्डाणपूल खुला करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार चतुर्थीच्या हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा