पणजी: वास्को येथील मंदार सुर्लकर खूनप्रकरणातील आरोपींच्या मुदतपूर्व सुटकेच्या आदेशाला राज्य सरकारसह मंदारच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तुरुंगातून मुदतपूर्व सोडण्यात आलेल्या रोहन धुंगट, शंकर तिवारी आणि जोवितो रायन या तिन्ही आरोपींना नोटीस बजावली आहे.
गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत राज्य सरकारने आणि मंदार सुर्लकर याच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रोहन धुंगटसह इतर सह-आरोपींना नोटीस जारी करून उत्तर मागवले आहे. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटकेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने या प्रकरणाला आता महत्त्वाचे कायदेशीर वळण मिळाले असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातमी अपडेट होत आहे>


