कोरगाव येथे ७.६५ लाखांचे अमली पदार्थ जप्त

दोघांना अटक; पेडणे पोलिसांची कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
24 mins ago
कोरगाव येथे ७.६५ लाखांचे अमली पदार्थ जप्त

पेडणे : पेडणे पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत कोरगाव येथील मेनवाडा परिसरातील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून सुमारे ७.६५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

८ ऑगस्ट रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पेडणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मालाड पश्चिम, मुंबई येथील अॅरॉन (४१ वर्षे)  सध्या कोरगाव, पेडणे येथे वास्तव्य,  वर्धा, महाराष्ट्र येथील ३५ वर्षीय झकारिया, सध्या केरी, पेडणे येथे वास्तव्य,  यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(ब)(ii)(A), २२(क), २१(ब), २२(ब) तसेच २९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत चरस, एलएसडी ब्लॉटर पेपर्स, एक्स्टसी पावडर आणि केटामाइन पावडर जप्त करण्यात आला.  जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ मेनवाडा, कोरगाव येथील एका भाड्याच्या खोलीत लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.   अटक करण्यात आलेल्या दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास पेडणे पोलीस करत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा