अभिनंदन लोढा यांच्या व्यवसायावर आयआयएम अहमदाबादचा अभ्यासप्रबंध

ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत व्यवसायाचा विस्तार

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
अभिनंदन लोढा यांच्या व्यवसायावर आयआयएम अहमदाबादचा अभ्यासप्रबंध

पणजी : द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (एचओएबीएल) यांच्या व्यवसाय मॉडेलवर आधारित अभ्यासप्रबंध देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (आयआयएमए) यांनी तयार केला आहे. कायदेशीर प्रक्रियेचे पालन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांच्या आधारे रिअल इस्टेट व्यवसायाचा विस्तार कसा साधला, यावर आधारित हा प्रबंध आहे.

‘एचओएबीएल : रेडी फॉर स्केलिंग अप’या शीर्षकाचा हा अभ्यासप्रबंध आयआयएम अहमदाबादचे सहयोगी प्राध्यापक सौरभ बोरा आणि आयएमटी गाझियाबादच्या डॉ. अपर्णा कंसल यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कायद्याचे काटेकोर पालन करत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कंपनीने व्यवसायाचा विस्तार कसा केला, याचा या अभ्यासप्रबंधात समावेश आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही कंपनीने विश्वासार्हता निर्माण केली असून, ग्राहकांचा विश्वास संपादन करत नियोजनबद्ध धोरणाद्वारे व्यवसायाची वाढ साधली आहे. जमीन ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणारी मालमत्ता असल्याची भूमिका स्वीकारून कंपनीने जमिनीचे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केले आहेत.

याबाबत अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले, आमच्या रिअल इस्टेट कंपनीवर आयआयएम अहमदाबादसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेने अभ्यासप्रबंध तयार करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जमिनीच्या मालकीपासून इतर सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवून आम्ही देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्याची दखल अशा प्रतिष्ठित संस्थेने घेतल्यामुळे आमच्या व्यवसायाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य अधोरेखित झाले आहे.

ते पुढे म्हणाले, आयआयएम अहमदाबादने केलेला हा अभ्यास नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल. शिस्त, पारदर्शकता आणि नावीन्य यांच्या बळावर पारंपरिक उद्योगांनाही नव्या उंचीवर नेता येते, असे समूहाचे अध्यक्ष अभिनंदन लोढा यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा