माशेल येथे चारचाकी -दुचाकीमध्ये भीषण अपघात; एक गंभीर जखमी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
06th August, 09:46 am
माशेल येथे चारचाकी -दुचाकीमध्ये भीषण अपघात; एक गंभीर जखमी

पणजी : माशेल येथे चारचाकी आणि दुचाकी यांच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.  दुचाकीस्वाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे.  अपघाता वेळी चारचाकी वाहनात त्याच्यासोबत असलेल्या आणखी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून; पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.