पणजीत 'कामत किनारा'जवळ केबिनवर कोसळले झाड; सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
06th August, 11:53 am
पणजीत 'कामत किनारा'जवळ केबिनवर कोसळले झाड; सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

पणजी : करंजाळे येथील कामत किनारा परिसरात गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी दुर्घटना घडली. या भागात असलेले एक जुने झाड अचानक सुरक्षा केबिनवर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत केबिनमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. 



मिळालेल्या माहितीनुसार, कामत किनाऱ्याजवळ तैनात असलेल्या या सुरक्षा रक्षकाच्या केबिनवर अचानक झाड कोसळले. झाड मोठे असल्यामुळे केबिनचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांच्या उपस्थितीत झाड बाजूला करून केबिनमध्ये अडकलेल्या सुरक्षा रक्षकाला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा