लघुशंकेसाठी दरीजवळचे सुरक्षा रेलिंग ओलांडणे बेतले जीवावर

आंबोलीत ४०० फूट खोल दरीत कोसळून निपाणीच्या डॉक्टरांचा मृत्यू

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
05th August, 10:39 am
लघुशंकेसाठी दरीजवळचे सुरक्षा रेलिंग ओलांडणे बेतले जीवावर

आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील निपाणी येथील एका पर्यटकाचा दुर्दैवी अपघात झाला. महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, कर्नाटक) असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे.

डॉ. सय्यद हे आपल्या ९ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, ते लघुशंकेसाठी सुरक्षेचे रेलिंग ओलांडून दरीच्या बाजूला गेले. यादरम्यान अचानक तोल गेल्याने ते थेट ४०० फूट खोल दरीत कोसळले. पॉईंटवरील एका स्थानिक मका विक्रेत्याने त्यांना दरीत कोसळताना पाहिले आणि तत्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.