स्वामी समर्थांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; वास्कोतील संतोष लमाणीला अटक

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हणजूण पोलिसांची कारवाई

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
05th August, 11:27 pm
स्वामी समर्थांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; वास्कोतील संतोष लमाणीला अटक

म्हापसा : श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी करून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी संतोष रामचंद्र लमाणी (४८, रा. बायणा, वास्को; मूळ बागलकोट, कर्नाटक) याला अटक केली आहे.
शिवोली येथील श्री स्वामी समर्थ परिवार मठाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश वेर्णेकर यांनी ३० जुलै रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ‘आमचे गोवा’ या फेसबुक ग्रुपवर श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल कथित अपमानास्पद मजकूर पोस्ट करण्यात आला होता. या पोस्टमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान संतोष लमाणी याची ओळख पटवून बुधवारी त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी आणि निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे आणि हरिश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा