कुंडईत चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; दाम्पत्य गंभीर जखमी

कुंडई येथे तपोभूमी रस्त्यावरून चुकीच्या बाजूने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
9 mins ago
कुंडईत चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; दाम्पत्य गंभीर जखमी

फोंडा: वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या प्रकारामुळे कुंडई येथे एक भीषण अपघात घडला आहे. तपोभूमी रस्त्यावरून 'राँग साईड'ने वेगाने आलेल्या एका ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणारे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय ?

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तपोभूमी रस्त्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने निष्काळजीपणा दाखवत आपली गाडी थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूने चालवली. याच दरम्यान आपल्या मार्गाने जाणाऱ्या दुचाकीला या भरधाव ट्रकने समोरून धडक दिली. दुचाकी थेट ट्रकच्या खाली गेली 

प्रसंगावधान राखत स्थानिकांनी धाव घेतली

या अपघातात दुचाकी चालवत असलेल्या पतीच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून, मागे बसलेल्या पत्नीच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमी दाम्पत्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. नियम मोडून चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या आणि निष्काळजीपणामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा