रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; आठ जणांवर आरोप निश्चितीचे आदेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
54 mins ago
रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; आठ जणांवर आरोप निश्चितीचे आदेश

पणजी : समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणात मेरशी येथील सत्र न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोज याच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध आरोप निश्चित (चार्ज फ्रेम) करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मेरशी येथील सत्र न्यायालयाच्या न्या. विजया आंब्रे यांनी हा आदेश दिला. या आदेशामुळे संबंधिताविरुद्ध नियमित खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ज्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामध्ये जेनिटो कार्दोज, अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा आणि साईराज गोवेकर यांचा समावेश आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता या सर्व जणांविरुद्ध पुरावे व साक्षीदारांच्या आधारे नियमित सुनावणी सुरू होणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा