Home >> गोवा >> मोबाईलचा वापर रिल्ससाठी नव्हे, नावीन्यपूर्ण गोष्टी शिकण्यासाठी करा!

मोबाईलचा वापर रिल्ससाठी नव्हे, नावीन्यपूर्ण गोष्टी शिकण्यासाठी करा!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : सम्राट स्टुडंट फाऊंडेशनच्या रौप्य महोत्सवात विद्यार्थ्यांचा सत्कार

Story: गोवन वार्ता। वार्ताहर |
27 mins ago
मोबाईलचा वापर रिल्ससाठी नव्हे, नावीन्यपूर्ण गोष्टी शिकण्यासाठी करा!

साखळी : जीवनात निश्चित व उच्च ध्येय ठरवून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांनाच यश मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यानेही अशीच जिद्द आणि चिकाटी बाळगून आपले अंतिम ध्येय गाठण्यासाठी आपले लक्ष्य ठरवून प्रयत्न करावे. त्यासाठी अभ्यासातील सातत्य व एकाग्रता याला फार महत्त्व आहे. त्यात शारीरिक तंदुरुस्ती सांभाळताना आपली मानसिक तंदुरुस्ती सांभाळणे अधिक महत्वाची आहे. मोबाईलवर नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शिकून त्याचा आपल्या ध्येयासाठी वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

साखळी येथील रवींद्र भवनात सम्राट इंटरनॅशनलतर्फे सम्राट स्टुडंट फाऊंडेशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या २५ जणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सिनेकलाकार अजय पुरकर, सम्राट स्टुडंट फाऊंडेशनचे अध्यक्ष धर्मा चोडणकर, सम्राट क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष संदीप निगळ्ये, सम्राट क्लब राज्य १ चे अध्यक्ष शशिकांत पुनाजी, आयोजन समितीचे अध्यक्ष रूपेश ठाणेकर, माजी राज्य अध्यक्ष तथा संचालक दीपक नार्वेकर आदींची उपस्थिती होती.

सिने कलाकार अजय पुरकर यांचाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर अजय पुरकर यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मार्गदर्शन केले.

२५ गुणवंतांचा सत्कार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते रियाना नदाफ, श्रुती सावंत, डेलस्टन डिसोझा, वृषभ सतरकर, रुद्रेश शेटकर, श्रेया नाईक, मंजुषा मडकईकर, भूपेश नाईक, डॉ. श्रुती नाईक, मंगेश साकोर्डेकर, डॉ. निमिषा पारकर, डॉ. तन्वी संजीगिरी, डॉ. तृप्ती आरोंदेकर, वैभवी गावस, वेदांग सतरकर, डॉ. श्रीराज सावंत, नेहा रोचा, डॉ. श्रीगणेश नागवेकर, प्रथमेश शानबाग, डॉ. ओजस्वी गावडे, रीमा परब, नमिता अडवईकर, विशाखा माटकर, मेखला साळकर व श्रावणी अभिषेकी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

हेही वाचा
सर्व पहा