Home >> गोवा >> मुख्य रस्ता बनला 'पार्किंग लॉट'; पणजी मामलेदार कार्यालयाबाहेर पार्किंगचा गोंधळ

मुख्य रस्ता बनला 'पार्किंग लॉट'; पणजी मामलेदार कार्यालयाबाहेर पार्किंगचा गोंधळ

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
2 hours ago
मुख्य रस्ता बनला 'पार्किंग लॉट'; पणजी मामलेदार कार्यालयाबाहेर पार्किंगचा गोंधळ

पणजी : पणजीत सरकारी कार्यालयांच्या परिसरात अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालला आहे. विशेषतः पणजी येथील मामलेदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी इमारत परिसरातील मुख्य रस्ता सध्या वाहनांच्या अनधिकृत पार्किंगचा अड्डा बनल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज या भागात विविध कामांसाठी येणाऱ्या हजारो नागरिकांना तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.



मामलेदार कार्यालयाकडे येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र व पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे, नागरिक आणि वकील आपली वाहने रस्त्याच्या कडेला किंवा 'नो-पार्किंग' क्षेत्रात उभी करण्यास हतबल झाले आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेनुसार, पणजी पोलीस मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. या वाहतूक कोंडीबाबत पाहणी केली असता, कलेक्टरेट आणि मामलेदार कार्यालयात सुनावणीसाठी आलेल्या वकिलांची ही वाहने असल्याचे समोर आले. परिसरात पार्किंगसाठी कोणतीही जागा उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावर गाडी पार्क करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता, अशी व्यथा तेथील वकिलांनी आणि नागरिकांनी मांडली.

या संपूर्ण प्रकारामुळे केवळ वाहतुकीचा खोळंबा होत नसून, अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. रस्ताच पार्किंग लॉट बनल्याने पदचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या नगर रचना आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा