विरोधी पक्षांची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चाच्या वेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याची संसदेत चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते व विरोधी पक्षातील खासदारांनी केली आहे.
वरील मागणी घेऊन मंगळवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासहीत विरोधी पक्षातील खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. सोमवारी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची सविस्तर चर्चा व्हायला हवी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चाच्या वेळी झालेल्या लाठीचार्ज मध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यावरून देशभरातून सरकारवर टीका होत आहे. यावरून संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती व चर्चेची मागणी केली होती. त्यामुळे कामकाज काल दिवसभरात सहा वेळी तहकूब करण्यात आले होते.