७२वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: कार्तिक, यामी, मामूट्टी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

नवी दिल्ली: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून शनिवारी संध्याकाळी नवी दिल्ली येथे ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाद्वारे (सीबीएफसी) २०२४ मध्ये प्रमाणित केलेल्या चित्रपटांमधून या विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या यंदाच्या पुरस्कारांवर ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने आपला वरचष्मा राखला, तर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, मम्मूट्टी आणि यामी गौतम यांनी प्रमुख पुरस्कारांवर नाव कोरले.
मराठी सिनेसृष्टीसाठीही यंदाचा सोहळा अभिमानास्पद ठरला असून ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे, तर अभय जोधपूरकर आणि योगेश देशपांडे यांनाही पुरस्कार मिळाले आहेत. तसेच कोकणी चित्रपट प्रकारात ‘मॉग असूम’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.
पुरस्कार विजेत्यांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे
मुख्य पुरस्कार (फीचर फिल्म्स): सर्वोत्कृष्ट चित्रपट: आर्टिकल ३७०
सर्वोत्कृष्ट अभिनेता: कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन) आणि मामूट्टी (भ्रमयुगम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: यामी गौतम (आर्टिकल ३७०)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: राजकुमार पेरियासामी (अमरन)
सर्वोत्कृष्ट मनोरंजन करणारा लोकप्रिय चित्रपट: कल्की २८९८ एडी
सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा चित्रपट: स्वातंत्र्य वीर सावरकर
राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांचा प्रसार करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट: कॅप्टन मिलर
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट: ३५ – चिन्ना कथा काडू
प्रादेशिक भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी
सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट: मोग आसू
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: श्रीकांत
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): अभय जोधपूरकर (घरात गणपती - गाणे: नवसाची गौरी माझी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): वैकोम विजयलक्ष्मी (चित्रपट: एआरएम - गाणे: अंगू वाना कोनिलू)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: जी. व्ही. प्रकाश कुमार (अमरन) आणि शाश्वत सचदेव (आर्टिकल ३७०)
सर्वोत्कृष्ट पटकथा: योगेश देशपांडे (स्वरगंधर्व सुधीर फडके) आणि बांदीरेड्डी सुकुमार (पुष्पा २)
सर्वोत्कृष्ट गीतकार: मनोज मुंतशीर (जाने दो - मैदान)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : विजय गांगुली (स्त्री २)
सर्वोत्कृष्ट संवाद: वेंकी अतलुरी (लकी भास्कर)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (छायांकन): शेहनाद जलाल (भ्रमयुगम)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन: मानस चौधरी (भूल भुलैया ३)
सर्वोत्कृष्ट ॲक्शन डायरेक्टर (स्टंट): अनल अरासू (महाराजा)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : दीपाली नूर, शीतल शर्मा (पुष्पा २)
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाईन : नितीन झिहान चौधरी (कल्की २८९८ एडी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: संजय मिश्रा (भक्षक)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: रुपश्री वरकाडी (मिथ्या) आणि सचना नामीदास (महाराजा),
सर्वोत्कृष्ट बालकलाकार: रिद्धिमान बॅनर्जी, तोपोमय देब, गीताश्री चक्रवर्ती (ओन्को की कोथिन) अरुणदेव पोथुला (३५ - चिन्ना कथा काडू) आणि अतिश एस. शेट्टी (मिथ्या),
सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन चित्रपट: भंगार
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: आनंद एल. राय (स्टॅच्यू ऑफ युनिटी)
सर्वोत्कृष्ट लघुपट : हमसफर (मराठी)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी (माहितीपट): राम-नामी
सर्वोत्कृष्ट पटकथा: फराज अली