अर्जुन काझिदोनीची निर्दोष सुटका

पणजी : फातोर्डा येथील २०२० मधील दुहेरी खून प्रकरणी आरोपी अर्जुन काझिदोनी याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. तसेच त्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली.
दारू न दिल्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर हे खूनप्रकरण घडले होते. याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्या. नीला गोखले आणि न्या. अमित जामसंडेकर या द्विसदस्यीय न्यायपिठाने हा आदेश दिला. २०२० साली फातोर्डा पोलीस स्थानक हद्दित एसजीपीडीए मार्केटजवळ वरील दुहेरी खूनप्रकरण घडले होते. दारूच्या वाटणीवरून झालेला वाद या खुनामागचे कारण होते.
दगडाने ठेचून व दारूच्या बाटलीने हल्ला करून भीमसी गस्ती आणि मुतन्ना बडीगेर यांचा खून करण्यात आला होता. तर सुनील सावंत याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अर्जुन मारुती काजिडोनी याला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सुनावणीनंतर मडगावच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २०२४ मध्ये अर्जुन काझिदोनी याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
जन्मठेपेच्या शिक्षेला अर्जुन काझिदोनी याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, अॅड. रोहन देसाई यांनी त्याची बाजू मांडली. त्यात त्यांनी पिडीताच्या रक्ताचे डीएनएचा अहवाल नकारात्मक आला होता. तसेच पिडीत सुनील सावंत यांची सत्र न्यायालयात उलटतपासणी झाली नव्हती. व इतर मुद्दे उपस्थित करून काझिदोनीला निर्दोष सुटका करण्याची मागणी केली. याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द करत त्याला निर्दोष ठरवले.