मांद्रे येथील महिलेला फटका

पणजी: पेडणे तालुक्यातील चोपडे येथे राहणाऱ्या ५७ वर्षीय महिलेची ‘कस्टमर सपोर्ट’ ॲपच्या नावाखाली १ लाख ८३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Online fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडे येथील कुर्बाणवाडा परिसरातील रहिवासी महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. १ आणि २ मार्च २०२६ रोजी अज्ञात आरोपींनी ७२९४१९२२५५ आणि ८९३१९९१७७७ या मोबाईल क्रमांकांवरून त्यांच्या व्हॉट्सॲपवर संदेश पाठवले.
या संदेशांद्वारे आरोपींनी तक्रारदार महिलेला 'कस्टमर सपोर्ट' ॲप (Customer support app) डाउनलोड करून त्याची लिंक उघडण्यास प्रवृत्त केले. संबंधित ॲप डाउनलोड केल्यानंतर आरोपींनी फसवणुकीच्या माध्यमातून त्यांच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांतून एकूण १ लाख ८३ हजार रुपये परस्पर काढून घेतले.
या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मांद्रे पोलीस (Mandrem Police station) करीत आहेत.