Home >> गोवा >> केळशी पंचायत कार्यालयात गोंधळ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

केळशी पंचायत कार्यालयात गोंधळ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

परवानगीशिवाय रेकॉर्ड रूममध्ये केला होता प्रवेश; कोलवा पोलिसांत नोंद

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
11 mins ago
केळशी पंचायत कार्यालयात गोंधळ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मडगाव: केळशी येथील ग्रामपंचायत कार्यालयात अधिकृत कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी आणि परवानगीशिवाय रेकॉर्ड रूममध्ये प्रवेश केल्याप्रकरणी संशयित शेल्टन फर्नांडिस व कार्नेलियो फर्नांडिस या दोघांवर कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शेल्टन फर्नांडिस व कार्नेलियो फर्नांडिस हे दोघे आपल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी केळशी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. या दरम्यान त्यांनी संगनमताने अधिकृत कामकाजाच्या कागदपत्रांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि तक्रारदाराला त्यांचे कायदेशीर कर्तव्य बजावण्यापासून रोखले. तसेच, दोन्ही संशयितांनी सचिवांच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन रेकॉर्ड विभागात बेकायदेशीरपणे प्रवेश करून अतिक्रमण केले.

याप्रकरणी कोलवा पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा
सर्व पहा