Home >> गोवा >> म्हादई अभयारण्यात हरवलेल्या कर्नाटकातील पाच जणांची सुटका

म्हादई अभयारण्यात हरवलेल्या कर्नाटकातील पाच जणांची सुटका

बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
41 mins ago
म्हादई अभयारण्यात हरवलेल्या कर्नाटकातील पाच जणांची सुटका

पणजी : म्हादई वन्यजीव अभयारण्यातील  (Madei Wildlife Sanctuary) जळवणी धबधबा परिसरात हरवलेल्या कर्नाटकातील पाच जणांची गोवा सरकारच्या वन खात्याच्या पथकाने यशस्वी सुटका केली. बचाव मोहिमेनंतर संबंधितांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अभयारण्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पाच जणांनी आवश्यक परवानगी न घेता अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला होता. जळवणी धबधबा परिसरात ते मार्ग चुकल्याने हरवले. याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम राबवून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.

वन विभागाने या घटनेनंतर अभयारण्यात विनापरवाना प्रवेश करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. पर्यटकांनी आणि ट्रेकर्सनी वन विभागाची पूर्वपरवानगी घेऊनच अभयारण्यात प्रवेश करावा तसेच सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा