Home >> गोवा >> रेईश-मागूश ग्रामसभेत सरपंच, पंच सदस्यांना मारहाणीचा प्रयत्न; एका विरुद्ध गुन्हा

रेईश-मागूश ग्रामसभेत सरपंच, पंच सदस्यांना मारहाणीचा प्रयत्न; एका विरुद्ध गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
50 mins ago
रेईश-मागूश ग्रामसभेत सरपंच, पंच सदस्यांना मारहाणीचा प्रयत्न; एका विरुद्ध गुन्हा

पणजी : बार्देश तालुक्यातील रेईश-मागूश ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सरपंच, पंच सदस्य आणि शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून ग्रामसभेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी सोनू आर. नाईक याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

साळगाव पोलिसांनी (Saligao Police)  दिलेल्या माहितीनुसार, रेईश-मागूश ग्रामपंचायतीच्या (Village Panchayat Reis-Magos)  सरपंच सुष्मिता एस. पेडणेकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने तक्रार दिली होती. त्यावरू सोनू आर. नाईक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १३२, १२६(२), २२१, ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता रेईश-मागूश ग्रामपंचायत भवनाच्या सभागृहात ग्रामसभा सुरू असताना संशयिताने सरपंच, पंच सदस्य तसेच उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना धमकावत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

आणि ग्रामसभेचे कामकाज शांततेत पार पडू नये; यासाठी अडथळा निर्माण करून त्यांच्या शासकीय कर्तव्यात व्यत्यय आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साळगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अक्षय फातर्पेकर करीत आहेत. याप्रकरणी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.  

हेही वाचा
सर्व पहा