Home >> गोवा >> बोरी साईबाबा मंदिरात गैरव्यवहार; ग्रामस्थांनी घेतला ताबा

बोरी साईबाबा मंदिरात गैरव्यवहार; ग्रामस्थांनी घेतला ताबा

ट्रस्टने साडेतीन वर्षांत बेकायदेशीरपणे गैरव्यवहार केला : ग्रामस्थांचा आरोप


13th July, 11:57 pm
बोरी साईबाबा मंदिरात गैरव्यवहार; ग्रामस्थांनी घेतला ताबा

पत्रकार परिषदेत बोलताना अक्षय नाईक. सोबत ग्रामस्थ.
गोवन वार्ता प्रतिनिधी
फोंडा : बोरी येथील साईबाबा सेवा मंडळाच्या ट्रस्टने २०२३ आली बेकादेशीरपणे मंदिराचा ताबा घेऊन गैरव्यवहार केला आहे. ग्रामस्थांनी सध्या मंदिराचा ताबा घेतला आहे. ग्रामस्थानी उभारलेल्या मंदिरात ग्रामस्थांना अधिकार असल्याची माहिती अक्षय नाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी रात्री साईबाबा सेवा मंडळाच्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ताबा घेतलेल्या ग्रामस्थांनीच यापूर्वी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. आरोपाचे खंडन करताना अक्षय नाईक म्हणाले की, ग्रामस्थांनी मंदिराचे कोणतीच तोडफोड केलेली नाही. साईबाबा सेवा मंडळाच्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला उच्च न्यायालयाचा आदेश ग्रामस्थांना मान्य नाही. ट्रस्टतर्फे मंदिरात अधिक गैरव्यवहार करण्यात आला असून भविष्यात गैरव्यवहार खपवून घेणार नाही. ट्रस्टला उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन ग्रामस्थ करणार नाहीत. ट्रस्टने गेल्या साडेतीन वर्षांत बेकायदेशीरपणे मंदिरात गैरव्यवहार केला आहे.
मंदिरात ट्रस्टच्या नावाने भाविकांची लुबाडणूक
साडेतीन वर्षांनंतर मंदिराचा ताबा घेण्याचे कारण विचारले असता अक्षय नाईक यांनी सांगितले की, मंदिरात ट्रस्टच्या नावाने भाविकांची लुबाडणूक केली जात आहे. ट्रस्टला आयकर खात्याने रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठविली होती; पण मंदिरात बेकायदेशीरपणे घुसून ताबा घेतलेले ट्रस्टचे पदाधिकारी उलट ग्रामस्थांवर आरोप करत आहेत. ग्रामस्थ यापुढे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा गैरव्यवहार खपवून घेणार नाहीत.