
ठेचा-भाकरी हे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध आणि पारंपरिक जेवण आहे. कमी साहित्य, साधी पद्धत आणि अप्रतिम चव यामुळे हा पदार्थ आजही अनेक ठिकाणी आवडीने खाल्ला जातो.
भाकरीसाठी साहित्य
२ मोठ्या वाट्या ज्वारीचे पीठ
२ कप गरम पाणी
चवीनुसार मीठ
ठेच्यासाठी साहित्य:
१०–१२ हिरव्या मिरच्या
८–१० लसूण पाकळ्या
चवीनुसार मीठ
२ बारीक चमचे तेल
१ बारीक चमचा मोहरी
१ बारीक चमचा जिरे
चिमूठभर हिंग
भाकरीची कृती
एका मोठ्या परातीत ज्वारीचे पीठ घ्या .पिठात मीठ घालून गरम पाण्याने जास्त मऊ नाही जास्त घट्ट नाही असं पीठ मळून घ्या .आता भाकरी थापून गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजा.थापलेली बाजू वरच्या बाजूने घाला आणि जरा पाण्याचा हात लावा.
ठेच्याची कृती
मिरच्या व लसूण थोडे भाजून घ्या.याने वास खमंग येतो.मग खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये मीठ घालून जाडसर वाटा.एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे व हिंगाची फोडणी द्या.त्यात वाटलेला ठेचा घालून १–२ मिनिटे परता. गरमागरम भाकरीसोबत ठेचा, कांदा, ताक किंवा दही आणि लोणी दिल्यास जेवणाची चव आणखी वाढते.