Home >> गोवा >> तिस्क-उसगाव येथे दुचाकीचा अपघात; एक जखमी

तिस्क-उसगाव येथे दुचाकीचा अपघात; एक जखमी

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचा संशय; दुचाकी झारखंड नोंदणीकृत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11 mins ago
तिस्क-उसगाव येथे दुचाकीचा अपघात; एक जखमी

पणजी : तिस्क-उसगाव येथे झारखंड नोंदणीकृत मोटरसायकलचा अपघात होऊन एक जण जखमी झाला. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित चालकाने मद्यधुंद अवस्थेत मोटरसायकल चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Goa Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अपघाताचे कारण आणि संबंधितांची जबाबदारी याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा