कांदोळी समुद्रकिनारी युवकाचा बुडून मृत्यू

हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सहलीदरम्यान घडली दुर्दैवी घटना

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10th July, 11:41 am
कांदोळी समुद्रकिनारी युवकाचा बुडून मृत्यू

पणजी : उत्तराखंडमधील शाहीद आफ्रिदी (वय २५) या युवकाचा कांदोळी समुद्रकिनारी (Candolim beach) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजी येथील एका हॉटेलमध्ये कार्यरत असलेले काही कर्मचारी सकाळी फिरण्यासाठी व पावसाळ्यातील समुद्राच्या नजाकतीचा आनंद घेण्यासाठी कांदोळी समुद्रकिनारी गेले होते. यावेळी शाहीद आफ्रिदी समुद्रात उतरला असता तो पाण्याच्या प्रवाहात सापडून बुडाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. युवकाला बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात (Goa Police) करण्यात आली असून, घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

सावधान! समुद्र खवळलेला आहे

समुद्र खवळलेला असताना पर्यटक आणि नागरिकांनी समुद्रात उतरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा
महत्वाच्या बातम्या
सर्व पहा