Home >> ताज्या बातम्या >> भाजप सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी निवडणूक रणनीतीचा घेतला आढावा

भाजप सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी निवडणूक रणनीतीचा घेतला आढावा

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा


08th July, 11:36 pm
भाजप सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी निवडणूक रणनीतीचा घेतला आढावा

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे पुष्पगुच्छ देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत दामू नाईक, अॅड. नरेंद्र सावईकर, खासदार सदानंद शेट तानावडे व इतर.
गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी गोवा दौऱ्यात पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, दत्ता खोलकर तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गोव्याला भेट दिली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही गोवा दौरा केला. त्यापाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी राज्याचा दौरा करून पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. बूथ, मंडळ आणि जिल्हा स्तरावर पक्षाचे काम अधिक प्रभावी करण्यासह विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.