Home >> गोवा >> दाबोळी येथे काळ बनून स्कूटरवर कोसळले झाड; वृद्ध चालकाचा मृत्यू

दाबोळी येथे काळ बनून स्कूटरवर कोसळले झाड; वृद्ध चालकाचा मृत्यू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
08th July, 10:43 am
दाबोळी येथे काळ बनून स्कूटरवर कोसळले झाड; वृद्ध चालकाचा मृत्यू

वास्को : माटवे–दाबोळी–वास्को या वर्दळीच्या रस्त्यावर बुधवारी सकाळी चालत्या स्कूटरवर एक मोठे झाड अचानक कोसळून चालक जागीच मृत्यू पावला.  (A scooter rider lost his life after a huge road side tree suddenly came crashing down onto the busy Matve–Dabolim–Vasco road). रस्त्या बाजूचे झाड फ्रांसिस्को नुनेस (६० वर्षे जेटी, जेटी सडा ) यांच्यासाठी काळ बनून आले व त्यांचा दुर्दैवी अंत झाला. 

झाड कोसळल्यानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा तातडीने दाखल झाल्या. झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

धोकादायक झाडे कापावीत

दरम्यान, रस्त्याच्या बाजूच्या धोकादायक झाडांची पाहणी करून कापावीत तसेच आवश्यक तेथे फांद्या छाटाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. अपघातासंदर्भात अधिक तपास सुरू आहे. 

हेही वाचा
सर्व पहा