Home >> गोवा >> वास्को शहरासाठी १४० कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पाला गती

वास्को शहरासाठी १४० कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पाला गती

आमदार कृष्णा साळकर यांच्याकडून कामाचा आढावा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11 hours ago
वास्को शहरासाठी १४० कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पाला गती

 वास्को : वास्को शहराच्या इत‌िहासिक मध्यवर्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित १४० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वास्कोचे आमदार कृष्ण साळकर यांनी जीसूडाचे (GSUDA)  अधिकारी आणि प्रकल्प सल्लागारांसमवेत शहरातील विविध भागांची पाहणी करून प्रस्तावित कामांचा आढावा घेतला.

या प्रकल्पाअंतर्गत शहरातील मूलभूत पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, सार्वजनिक जागांचा विकास, रस्ते, पादचारी सुविधा, सुशोभीकरण तसेच शहरी वातावरण अधिक आकर्षक व नियोजनबद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच वास्कोची ऐतिहासिक ओळख जपत शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी आमदार कृष्ण साळकर म्हणाले की, १४० कोटी रुपयांचा हा विकास प्रकल्प वास्को शहराला (Vasco city) नवे रूप देणारा ठरेल. या प्रकल्पामुळे शहर अधिक स्वच्छ, सुबक, नियोजनबद्ध आणि रहिवासी, व्यापारी तसेच पर्यटकांसाठी अधिक आकर्षक बनेल." या प्रकल्पामुळे वास्कोच्या शहरी विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा