Home >> देश -परदेश >> ईपीएफओच्या ऑनलाईन सेवा आजपासून पुन्हा सुरू

ईपीएफओच्या ऑनलाईन सेवा आजपासून पुन्हा सुरू

आता पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम तत्काळ काढता येणार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 mins ago
ईपीएफओच्या ऑनलाईन सेवा आजपासून पुन्हा सुरू

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ऑनलाईन सेवा आज २ जुलैपासून पुन्हा सुरू होत आहेत. (EPFO's online claim processing and submission process will again become functional from Thursday, 2 July.)  अपग्रेड प्रक्रियेत ईपीएफओने आपल्या सदस्यांसाठी मोठा बदल घडवून आणला आहे. यामध्ये युपीआय आणि एटीएमद्वारे पीएफ रक्कम काढण्याची सुविधेचा समावेश आहे. या सुविधेनंतर सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून तब्बल ७५ टक्के रक्कम तत्काळ काढता येणार आहे. 

 गेले सहा दिवस अपग्रेड प्रक्रियेसाठी सहा दिवसांपासून ऑनलाईन सेवात बंद होत्या.  पीएफ पैसे काढणे, ई-पासबुक पाहणे आणि ऑनलाईन दावा सादर करणे यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा सदस्यांना उपलब्ध नव्हत्या. डेटाबेस एकत्रीकरण आणि सॉफ्टवेअर अपग्रेडच्या कामामुळे या सेवा २६ जूनपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या. आता २ जुलैपासून सर्व डिजिटल सेवा पुन्हा सुरू होत आहेत.

ईपीएफओने स्पष्ट केले आहे की, ही प्रणाली सुधारणा भविष्यात सदस्यांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे सदस्यांनी सहकार्य आणि संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तातडीच्या मदतीसाठी किंवा माहितीसाठी सदस्यांना १४४७० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. सध्या पीएफ पैसे काढण्यासाठी यूएएन पोर्टलवरील दीर्घ प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मात्र, नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर ही प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि डिजिटल स्वरूपाची होणार आहे.


हेही वाचा
सर्व पहा