Home >> गोवा >> गोवाभर वटपौर्णिमा उत्साहात साजरी

गोवाभर वटपौर्णिमा उत्साहात साजरी

महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून मागितले पतीच्या दीर्घायुष्याचे वरदान

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
46 mins ago
गोवाभर वटपौर्णिमा उत्साहात  साजरी

वास्को : वास्कोसह गोव्यातील विविध भागांत सोमवारी वटपौर्णिमा (Vat Purnima 2026 in Goa) उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मोठ्या संख्येने विवाहित महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी वडाच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालत पवित्र धागे बांधले. आणि धार्मिक विधी पार पाडले. विविध मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी वटपौर्णिमेचे विधी पार पडताना भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

स्थानिक महिलांसह नागरिकांनीही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पती-पत्नीच्या दृढ नात्याचे आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जाणारा वटपौर्णिमा उत्सव गोव्यासह पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.

हेही वाचा
सर्व पहा