दोन आठवड्यांत चौथ्यांदा वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलनंतर (Petrol-Diesel) सीएनजीच्या (CNG) किमती ही वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपये वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांतील ही चौथी दरवाढ असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जागतिक स्तरावर ऊर्जा स्रोतांच्या वाढत्या किमतीमुळे इंधनदरांवर दबाव वाढत असून; त्याचा परिणाम सीएनजीच्या दरांवरही होत असल्याचे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले. सलग होत असलेल्या दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक, रिक्षा-टॅक्सी चालक तसेच खासगी वाहनधारकांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे.
आणखी दर वाढण्याची शक्यता
दरम्यान, सीएनजीवरील वाढत्या खर्चाचा परिणाम दैनंदिन प्रवास खर्चावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, येत्या काळात आणखी दरवाढ होण्याची भीती ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.